Subscribe Us

गेवराई तालुका नवनियुक्त निवड

*गोर सेना राष्ट्रीय अध्यक्ष अरूण भाऊ चव्हाण यांचा गेवराई तालुक्यात झंझावाती दौरा..*


जातेगाव- दि. 16/08/2021 रोजी गोर सेना राष्ट्रीय अध्यक्ष अरूण भाऊ चव्हाण हे अध्यक्ष झाल्या पासून प्रथमच गेवराई तालुक्यात आले त्यांचे गेवराई नगरीत जंगी स्वागत करण्यात आले त्यात जातेगाव, मारफळा, काठोड़ा, भेंडटाकळी, खोरी तांडा, खोपटी तांडा, सेलु तांडा येथील जेष्ठ मंडळी कडून जंगी स्वागत करण्यात आले त्याच बरोबर सिरसदेवी, तलवाडा, जातेगाव सर्कल पदाधिकारी अणि तालुका पदाधिकारी यांच्या कडून जल्लोषात स्वागत करण्यात आले. 

              त्याच बरोबर नव नवीन पद नियुक्त करण्यात आले त्यामध्ये गोर सेना ऊसतोड संघटना ही पहिल्यांदा सक्रिय होत आहे त्यात विविध पदे भरण्यात आली साहेबराव जाधव यांची गोर सेना ऊसतोड संघटना जि अध्यक्ष बंडू राठोड जि उपाध्यक्ष अनिल राठोड ता अध्यक्ष विलास चव्हाण ता उपाध्यक्ष बाळाभाऊ पवार ता उपाध्यक्ष वैजनाथ राठोड ता सचिव तसेच गोर सेना जि सह संघटक म्हणून बाबासाहेब चव्हाण, ता उपाध्यक्ष म्हणून बाळू राठोड सह कोषाध्यक्ष सतीश राठोड तसेच सिरसदेवी सर्कल प्रमुख म्हणून विठ्ठल राठोड सचिव विकास राठोड तलवाडा सर्कल प्रमुख संजय चव्हाण  जातेगाव गण प्रमुख म्हणून राहुल पवार सह संघटक म्हणून युवराज पवार यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली व आधि निवड झालेल्या पदाधिकारी जि उपाध्यक्ष सतीश आमगोत बरोबरच गेवराई तालुका प्रमुख योगेश पवार अनिल चव्हाण प्र. प्रमुख गणेश राठोड ता सचिव अंकुश जाधव संघटक मनोज राठोड कोषाध्यक्ष बाळू पवार सोशल मीडिया ता अध्यक्ष अंकुश राठोड जातेगाव सर्कल प्रमुख प्रेमदास राठोड सर्कल प्रसिद्धी प्रमुख यांना नियुक्ति पत्र देण्यात आले यावेळी गोर सेना राष्ट्रीय अध्यक्ष अरूण भाऊ चव्हाण गोर सेना डॉ विंग प्रदेश अध्यक्ष डॉ जीवन अण्णा राठोड विलास राठोड विभागीय संघटक जिल्हा प्रमुख अरुण भाऊ पवार जिल्हा संयोजक देविदास चव्हाण सर सह संयोजक बिभीषण राठोड सर जिल्हा उपाध्यक्ष प्रमुख एकनाथ राठोड शाम भाऊ राठोड व्यापारी संघटना जि अध्यक्ष यांच्या उपस्थितीत निवड करून नियुक्ति पत्र देण्यात आले.

            तसेच प्रहार जण शक्ति आघाडी कडून जनार्दन पवार ओबीसी ता अध्यक्ष अजय डोंगरे युवक ता अध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर शरद चांभारे सर्कल प्रमुख यांनी अरुण भाऊ चव्हाण यांचे अभिनंदन केले त्याच बरोबर सामजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे पत्रकार गोपाल चव्हाण यांनी वृक्ष देऊन स्वागत केले...


Post a Comment

0 Comments